बेळगाव जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांची रवळनाथ देवालयाला सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2022

बेळगाव जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांची रवळनाथ देवालयाला सदिच्छा भेट

 

चंदगड येथील रवळनाथ देवालयाला सदिच्छा भेट प्रसंगी बेळगाव जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी, चंदगड चे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश अमृत बिराजदार, न्यायाधीश चारुदत्त शिपकुले व अन्य 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगडसह ८४ खेड्यांचे अधिपती व श्रध्दास्थान असलेल्या देव रवळनाथ देवालयाला बेळगाव जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी व त्यांच्या सहकारी न्यायाधीशांनी आज भेट दिली. रवळनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव मधुकर देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चंदगड चे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश अमृत बिराजदार यांनी जिल्हा न्यायाधीश जोशी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. 

यावेळी बेळगावाचे मुख्य कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए .व्ही श्रीनाथ, जिल्हा न्यायाधीश विजय नेरले, जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश, जिल्हा न्यायाधीश हेमंत कुमार, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश विजय आरस, दिवाणी न्यायाधीश शंभरलिगंय्या मोडीमठ, दिवाणी न्यायाधीश गणपती भट, न्यायाधीश ग्रामोपाध्याय आदींचा सत्कार यावेळी चंदगडचे न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंद्रजित सावंत-भोसले, शिवाजीराव सावंत-भोसले,कृष्णा तुप्पट, गोविंद गुरव (पुजारी) आदी उपस्थित होते. दरम्यान न्यायाधीश चंद्रशेखर जोशी व बेळगावच्या अन्य न्यायाधीशांनी देवरवाडी येथील वैजनाथ मंदीरालाही भेट सदिच्छा दिली.









No comments:

Post a Comment