दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्वघाटनप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, शेजारी इतर मान्यवर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
व्यवहार उपयोगी विज्ञान संशोधन ही काळाची गरज आहे .गरजही शोधाची जननी आहे.विद्यार्थ्याच्या क्षमता कौशल्यास चालना देणारी विज्ञान प्रदर्शनेे मुलांच्यात विज्ञान विषयाची आवड निर्माण करतात.कृती व स्फुर्तीस चालना देणारी अशी विज्ञान प्रदर्शने प्रत्येक शाळेत व्हावीत ' असे प्रतिपादन चंदगड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. सुमन सुभेदार यांनी केले.
त्या दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्वघाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ .सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भोगण हिने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.डी. देवळे होते.
वेळी वृषाली झेंडे, श्रद्धा कानूरकर, संस्कृती वाके यांनी मनोगत व्यक्त केले. टी. टी. बेरडे, टी. एस . चांदेकर यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगितले.
विज्ञान प्रदर्शनात एकूण ६५ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता यामध्ये लहान गटात अनुक्रमे हर्षदा भवारी, युवराज हळवणकर, आर्या निळकंठ, कार्तिक निट्टूरकर यांनी तर मोठया गटात अनुक्रमे गौरव वाडकर, सुकन्या दळवी, वृषाली झेंडे, झोया मुल्ला यांनी क्रमांक पटकावले.
कार्यक्रमाला सौ.पी.एस सुतार .एम.व्ही.कानूरकर, एस.जी साबळे, डी.जी. पाटील, वर्षा पाटील, विद्या शिंदे, टी.व्ही. खंदाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे, अक्षता पवार यांनी तर आभार मानसी घवाळे हिने मानले.
No comments:
Post a Comment