तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे उद्या सोमवार दि. ७ रोजी श्री ब्रम्हदेव मंदिरात श्री ब्रम्हदेव देवाच्या पाषाणाक मुखवटे चढवणे, प्राणप्रतिष्ठापणा व अभिषेक सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात मंत्रघोषात मुखवटे प्राणप्रतिष्ठापणा व अभिषेक सोहळा दुपारी १२ नंतर होणार आहे. यानंतर महाप्रसाद व रात्री जागराचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तानी घेण्याचे आवाहन श्री ब्रम्हदेव देवस्तान कमिटी व तेऊरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment