मंगाईदेवी मंदिर फोटो |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री.मंगाईदेवी मंदिराचा सातवा वर्धापन दिन कार्यक्रम गुरूवार १० मार्च ते शनिवार १२ मार्च रोजी डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या अधिपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमानिमीत्त भजन, कीर्तन, दिंडी व महाप्रसाद असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे गुरूवारी सकाळी १० वा. लक्ष्मी व धाकलू कल्लू पाटील यांच्या हस्ते मुहूर्त मेढ कार्यक्रम होणार आहे. तर ११ मार्च रोजी सोनाबाई व शिवाजी कल्लू पाटील यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक व धार्मिक विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी बाळू भक्तीकर शुक्रवारी संध्याकाळी डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व गुरुवारी रात्री राजीवजी सुतार (करवीर) यांचे कीर्तन होणार आहे.
तर शुक्रवारी ११ मार्च रोजी रात्री हणमंत मिसाळ (मिरज) यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी सकाळी कालाकीर्तन, गंगा पुजन व महाआरती व जिल्हा परिषद सदस्या विद्याताई पाटील व गव्हरमेन्ट कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद पुजन होणार आहे.व रात्री सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील शाहीर सदाशिव निकम यांचा शाहिरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी भविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन श्रवण सुखाचा व महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment