चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कै. केदारी बाळकृष्ण रेडेकर यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. बुधवार दि. ९ मार्च सकाळी ९ वाजता कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी अधिक माहीतीसाठी 9763262155 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक २००१, द्वितीय १५०१, तृतीय १००१, उत्तेजनार्थ ५०० व उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे
१) जगणे कठीण होत आहे
२) मराठी असे आमची मायबोली
३) खरे शिक्षण ऑनलाईन कि ऑफलाईन
४) देश हा देव असे माझा
५) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर
No comments:
Post a Comment