कडलगे येथील उस जळीत क्षेत्राला अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची भेट, शेतकर्‍यांशी साधला संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2022

कडलगे येथील उस जळीत क्षेत्राला अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची भेट, शेतकर्‍यांशी साधला संवाद

कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे ऊस जळीत क्षेत्रातील शेतकर्‍यांशी संवाद साधताना अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, सेक्रेटरी काटे, बिर्जे, पाटील आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे ५ मार्च रोजी अचानकपणे आग लागून जवळपास १०० एक्करातील ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी जळीतग्रस्त क्षेत्राला शेती अधिकाऱ्यांसह भेट देऊन पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहानुभूत व्यक्त केली.

       यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जळीत ऊस लवकरात लवकर कारखान्याला न्यावयास हवा अशी विनंती केली. त्यावर उपस्थित शेती खाते स्टाफला जास्तीतजास्त तोडणी वाहतुक यंत्रणा देवून अथर्व दौलत कारखान्यास सदरचा ऊस गाळपास वे नेण्याबाबत सुचना दिल्या व त्यानुसार नियोजन करणेस सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी रस्त्याबाबतच्या आडचणी हि मांडल्या. या गावचे सरपंच सुधीर गणपती गिरी बुवा यांनी हि दुरध्वनीवरुन श्री. खोराटे यांना ऊसाबाबतच्या समस्या सांगून समक्ष प्लॉट पाहणी व शेतकऱ्यांशी हितगुज केल्याबाबत समाधान व्यक्त केले. या परिसरातील कारखान्यास ऊस पुरवठा करणारा उत्पादक या कारखान्याचा घटक असून जे जे शक्य असेल त्या ठीकाणी अथर्व प्रशासनाकडून सहकार्य करणेत येईल अशी ग्वाही मानसिंग खोराटे यांनी दिली. 

           कारखान्याचे चेअरमन प्रत्यक्ष स्वता : अशा अडचणीच्या वेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या विवंचना समजावून घेण्याचा प्रसंग पहिलाच आहे असे अवर्जून शेतकऱ्यांनी सांगितले व याबद्दल समाधान व्यक्त केले. आम्ही कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन विश्वास सार्थ करु असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे सर्कल ऑफीस पुंडलिक बिर्जे, हणमंत पाटील, सतीश नाईक, संजय राऊत, विलास वैजू पाटील, तानाजी रामू पाटील, सुरज शशिकांत पाटील, प्रमोद आनंदा पाटील, लक्ष्मण तुकाराम गिरी बुवा, अशोक खंडू पाटील, रामचंद्र विठोबा पाटील, बाळाराम देवजी पाटील, प्रकाश मोतिराम पाटील, खंडू शामू पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment