हर हर महादेवच्या गजरात तेऊरवाडी येथे श्री ब्रम्हदेव मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2022

हर हर महादेवच्या गजरात तेऊरवाडी येथे श्री ब्रम्हदेव मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

मिरवणूकीत सहभागी झालेले  तेऊरवाडी ग्रामस्थ

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

         हर हर महादेवच्या गजरात खूपच भक्तिमय वातावरणात तेऊरवाडी  (ता. चंदगड) येथे श्री ब्रम्हदेव मंदिरात श्री ब्रम्हदेव देवाच्या पाषाणावर मुखवटे चढवणे, प्राणप्रतिष्ठापणा व अभिषेक सोहळा असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

        सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सजवलेल्या ट्रॅक्टरमधून  मुखवट्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आली. यावेळी गावातील सर्व भजनी मंडळे अबाल वृद्ध सहभागी झाले होते. हजारो सुहासिनी डोकीवर शुभ कलश घेऊन मुखाने महादेव व हरिणामाचा गजर करत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर गावापासून दूर राईमध्ये असलेल्या भव्य मंदिरात  मंत्रघोषात मुखवटे प्राणप्रतिष्ठापणा व अभिषेक सोहळा पूर्ण करण्यात आला. यानंतर  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तानी घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री ब्रम्हदेव देवस्तान कमिटी व तेऊरवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम  केले.

No comments:

Post a Comment