चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात बोलताना डॉ. पी. एम. शहापूरकर, शेजारी प्राचार्य डॉ. पी. आर.पाटील, डॉ. शाहू गावडे व इतर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जशी व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ततेसाठी अन्न, वस्त्र, निवारा यांची गरज आहे, तितकीच समाजाची ही गरज आहे. सामाजिक प्रश्न, सामाजिक अस्वस्थता, विचलन, संघर्ष यांचे आकलन झाल्याशिवाय व परिणाम समजून देण्यासाठी समाज अभ्यासणारी शास्त्रे विज्ञानाइतकीच महत्त्वपूर्ण आहेत, तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थात सामाजिक शास्त्रे शिकवली जात आहेत. आजचे युग हे आतंरविद्याशाखां व इतरही शाखांना विद्यार्थ्यांनी अभ्यासले तर समाजाच्या कल्याणासाठी विचार सुरू होईल.म्हणून सामाजिक स्वास्थासाठी सर्व विद्याशाखानी सोबत चालायला हवे असे आवर्जून आवाहन डॉ. शहापूरकर यांनी केले.
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शाहू धानू गावडे लिखित काजू व्यवसायातील कामगार स्त्रिया या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिताना संबोधीत करताना उपरोक्त मत मांडले.
समाजशास्त्र विभागाने यासाठी पुढाकार घेऊन समाजभान जपावे. यामुळे इतरविद्याशाखेचे ज्ञानही विद्यार्थ्यांना होवून विद्यार्थी किलानुरूप घडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मांगलेकर, सहयोगी प्राध्यापक शासकीय महिला महाविद्यालय, बेळगाव यांनी उपस्थिती होती. त्यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. उच्च शिक्षणातील संशोधनामुळे ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पी. आर.पाटील यांनी भूषविले. त्यांनी समाजाला व शिक्षण क्षेत्राला संशोधन किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य केले.
लेखक डॉ. शाहू गावडे यांनी चंदगड तालुक्यातील कामगार महिलांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास व त्यातून समोर आलेले निकर्ष मांडले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सुञसंचालन केले. प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment