मौजे बिजूर (ता. चंदगड) गावचे सुपूत्र व कुमार विद्यामंदिर चंदगडचे अध्यापक एकनाथ मष्णू चौकुळकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त गुरूवार २८ एप्रिल २०२२ रोजी चंदगड येथे सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अँड विजय कडूकर असतील.
यावेळी आमदार राजेश पाटील, भरभूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य उद्योग विभागामार्फत ज्यूनिअर इंजिनिअर या पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेमध्ये ९९.८० % गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात २४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. पवन एकनाथ चौकुळकर यांचा गंगाधर वंजारी व संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यकमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.


No comments:
Post a Comment