केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात चंदगड काँग्रेसचा चंदगड तहसिलवर भोंगा मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2022

केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात चंदगड काँग्रेसचा चंदगड तहसिलवर भोंगा मोर्चा

केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात तहसिलदार विनोद रणावरे याना निवेदन देताना काँग्रेसचे कार्यकर्ते.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 केद्रातील भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे वाढती महागाई , बेरोजगारी यामुळे त्रस्त जनतेचा आक्रोश व जनतेच्या मनातील भावना विविध माध्यमातून केंद्र सरकार पर्यंत पोचवण्यासाठी चंदगड तालूका काँग्रेसच्या वतीने चंदगड तहसिल कार्यालयापर्यंत जुमला ( भोंगा ) आंदोलन करून तहसिलदार विनोद रणवरे याना निवेदन दिले .

 प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष  नाना पटोले  व जिल्हा अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील  यांच्या आदेशा नुसार कोल्हापूर व राज्यभर महागाई विरोधात कॉग्रेस पक्षाची भोंगा आंदोलने होतं आहेत . आज दिनांक 27 एप्रिल रोजी चंदगड तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने चंदगड येथील संभाजी चौक येथे हे आक्रोश आंदोलन करण्यात आले . केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई विरोधात भोंगा आंदोलन करत केंद्र सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आले . यानंतर तहसिलदार विनोद सणावरे याना निवेदन देवून आंदोलन संपविण्यात आले . यावेळी संभाजीराव देसाई अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चंदगड , विलास पाटील तात्यासाहेब देसाई , राजेंद्र परीट ,अशोक दाणी, कलिम मदार ,प्रसाद वाडकर , आनंद हळदनकर ,शिवाजी सुभेदार  ,  विष्णू गावडे , दिलीप चंदगडकर ,किसण पाटील,  जयवंत गावडे, अभि गुरबे  आदिनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
No comments:

Post a Comment