रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तुडयेचे प्रज्ञाशोध परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावच्या श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तुडये (ता. चंदगड) या विद्यालयातील सन 2021 /22 या शैक्षणिक वर्षामध्ये दक्षिण महाराष्ट्र मंचेस्टर प्रज्ञाशोध परीक्षेत 31 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे १) कुमारी कोलकार वैष्णवी संजय (राज्यात प्रथम) २) कुमार मनगुतकर शंतनू शंकर (केंद्रात प्रथम)३) कुमारी मयेकर सरिता महादेव ( केंद्रात द्वितीय) या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक मोहिते व्हीं. के., मुख्याध्यापक पाटील एस. जी., सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार राजेश पाटील यानी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment