संगणक परिचालक काम बंद आंदोलन करुन जिल्हा परिषदेवर क्रांती मोर्चा काढणार - गटविकास अधिकाऱ्यांना संगणक परिचालकांचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2022

संगणक परिचालक काम बंद आंदोलन करुन जिल्हा परिषदेवर क्रांती मोर्चा काढणार - गटविकास अधिकाऱ्यांना संगणक परिचालकांचे निवेदन

गटविकास अधिकाऱ्यांना संगणक परिचालक निवेदन देताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या विविध मागण्या संदर्भात आम्ही दि.२७/०४/२०२२ पासून काम बंद आंदोलन करत आहे. त्यामुळे संगणक परिचालकांच्या मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करून संगणक परिचालकाना न्याय द्यावा. संगणक परिचालक यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार न झाल्यास १ मे २०२२ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर क्रांती मोर्चा व ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना संगणक परिचालकांनी निवेदनातून दिला आहे. 

संगणक परिचालकांच्या मागण्या खालील प्रमाणे........

1) संगणक परिचालक यांना आकृती बंधामध्ये घेण्याचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेला लेखी दिलेल्या पत्रानुसार सर्व संगणक परिचालक यांना आकृतीबंधानुसार येवलकर समितीच्या शिफारस नुसार कायम करण्यात यावे.

2) थकीत सर्व पगार मार्च अखेर जमा करण्यात यावे.

3) ज्यांचे ese id नाही, पॅनकार्ड मिस मॅच, अशांना विविध कारणाने कुणाचे दोन वर्षांचे कुणाचे एक वर्षांचे कुणाचे सहा महिने तर कुणाचे एक महिन्याचे पेमेंट झाले नाही यांचे तात्काळ पेमेंट जमा करण्यात यावे.

4) कोल्हापूर जिल्हा समन्वयक याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.

5) संगणक परिचालक यांना शासन निर्णयानुसार कामे दिली असताना इतर विभागाची कामे लावली जातात, अशा प्रकारची कामे लावू नयेत.

6) ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संगणक परीचालक याच्यां कामा व्यतीरिक्त इतर कामे लावली जात आहेत. त्यामुळे संगणक परीचालक व ग्रामपंचायत मधील सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक मध्ये वाद होत आहेत. त्यामुळे संगणक परीचालक यांना मानसिक व शारीरिक समस्येला सामोरे जावे लागल आहे. दबाव तंत्र वापर करून काम करून घेणे हे तात्काळ थांबवण्यात यावे.

7) Crs पोर्टल वरील कामावर संगणक परिचालक यांचा बहिष्कार आहे. सदर काम करण्यास कोणताही दबाव टाकू नये. 

(8) जल जीवन मिशन हे संगणक परीचालक यांचे काम नसताना जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे, ते तात्काळ बंद करण्यात यावे.

(9) कोरोना कालावधीमध्ये संगणक परीचालक यांनी लसीकरण, टोल नाका ड्युटी, गावामध्ये फवारणी जनजागृती केली आहे. पण बऱ्याच संगणक परिचालक यांना १०००/- रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान मिळाले नाही. ते देण्याबाबत आदेश सर्व ग्रामपंचायतीना देण्यात यावा.

(10) स्टेशनरी व टोनर हे अद्याप मिळालेले नाहीत. त्याची चौकशी होऊन दरमहा मिळण्याची कारवाई करणेत यावी. 

11) कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग कधीच देण्यात आले नाही. सदरच्या ट्रेनिंगसाठी PPT चा वापर करून ट्रेनिंग घ्यावे असे म्हणतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी.

12) जिल्हा स्तरावर संगणक परीचालक व जिल्हा परिषद यांचे कम्युनिकेशन कधीच होऊ दिले नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी.

13) तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर जुने संगणक परीचालक यांची नेमणूक करण्याबाबत सूचना असताना नवीन संगणक ऑपरेटर नेमणूक करण्यात आली आहे. सदर भरती बोगस करण्यात आली असून सदर भरतीची चौकशी करण्यात येऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी.

14) ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या संगणक परीचालक यांची कोणत्या ना कोणत्याही कारणाने तक्रार देऊन त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. अशा संगणक परीचालकांना कामावर हजर करून घेण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे.

(ता-चंदगड तालुक्यातील हलकर्णी – विक्रम कडूकर, पाटणे-ओमकार वनकुंद्रे, नांदवडे- संतोष गावडे) 


15) ज्यांनी काम करून सुद्धा हजेरी न लागणे किंवा इन्व्हाईस तांत्रिक अडचणीमुळे न होणे या किंवा ग्रामसेवक लॉगिन मधून इनव्हाईस न होणे यामुळे अनेकांची पेमेंट झालेली नाहीत. ती करण्यात यावीत कारण ते पैसे ना ग्रामपंचायतला वर्ग झालेत ना केंद्रचालकांना मिळाले. Csc कंपनी जेंव्हा पासून सुरू झाली तेंव्हा पासून आजतागायत ज्या केंद्रचालकांचे वरील कारणामुळे मानधन मिळाले नाही ते सर्व केंद्रचालकांच्या खात्यावर जमा करावे. 

16) २०१६/२०१७ चे थकीत पेमेंट तात्काळ देण्यात यावे.

17) संगणक परीचालक यांना किमान वेतन प्रमाणे दरमहा १५,०००/- पगार देण्यात यावा.

चंदगड तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने दि. २७/०४/२०२२ पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत. दि.०१/०५/२०२२ रोजी वरील मागण्या संदर्भात क्रांती मोर्चा दसरा चौक, शाहू पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जिल्हा परिषद कार्यालयपर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्च्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित राहत असल्याने संगणक परीचालाकांना होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन संगणक परिचालकांनी चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर अध्यक्ष राजू कुंभार, उपाध्यक्ष सौ. मंदाकिनी देसाई, सचिव हणमंत गावडे यांच्यासह अन्य सदस्यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment