शाहू मिल हेच शाहूंचे जिवंत स्मारक व्हावं - खासदार संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2022

शाहू मिल हेच शाहूंचे जिवंत स्मारक व्हावं - खासदार संभाजीराजे

प्रदर्शन पाहताना खासदार संभाजीराजे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         रयतेला रोजगार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली कोल्हापुरातील शाहुमिल हे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

          लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्ताने आज रोजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांनी शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांचे दुर्मिळ फोटो प्रदर्शनास भेट दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे प्रकाशन संभाजीराजे यांच्या हस्ते पार पडले.   

       यंदा राजर्षी शाहूंचे शताब्दी वर्षे आहे. शाहू जन्मस्थळाचे राहिलेली काम पूर्ण करावे. आज मी शाहूंच्या शाहुंची या ठिकाणी आहे. हे स्मारक जीवित कसे करता येईल हे पाहावे. हे काम फक्त राज्य सरकारचे नाही, केंद्रसरकारचे देखील आहे. मी राज्यसभेत देखील हा प्रश्न मांडला होता. त्यामुळे शाहूंची हि स्मारके जीवित करावेत. अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.     

         प्रदर्शनातील दुर्मिळ छायचित्रे पाहून खासदार संभाजीराजेंनी अन्येक शाहूंच्या आठवणीं जाग्या केल्या. यावेळी देवीकाराणी पाटील आणि अमित अडसूळ यांनी दुर्मिळ छायाचित्रांची तर प्राचार्य अजेय दळवी आणि विजय टिपुगडे यांनी १३० कलाकारांनी काढलेल्या राजर्षी शाहूंच्या चित्रांची माहीती दिली. यावेळी आदित्य बेडेकर, उदय गायकवाड सुखदेव गिरी, संजय पवार, अमर पाटील, अभिजित पाटील, उदय घोरपडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment