कोवाड केंद्र शाळेत 'शाळा पूर्वतयारी' मेळाव्यास प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2022

कोवाड केंद्र शाळेत 'शाळा पूर्वतयारी' मेळाव्यास प्रतिसाद

केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे शाळा पूर्वतयारी मेळावा प्रसंगी उपस्थित शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक विद्यार्थी व मान्यवर

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        महाराष्ट्र शासन, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या  शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत पालक मेळावा केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवागत विद्यार्थ्यांची नोंदणी व स्वागत तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. अनिता कल्लाप्पा भोगण होत्या.

                                                                            जाहिरात

जाहिरात

           कार्यक्रमाचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांनी केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत शासनामार्फत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजना व सुविधा, शाळा राबवत असलेले उपक्रम व शाळेची वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. माहिती डिजिटल फलकाचे अनावरण सरपंच सौ. अनिता भोगण यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दाखल पात्र ५१ मुलांपैकी  बहुतांशी मुले व पालक उपस्थित होते. 

          यावेळी विविध स्टॉल मांडून पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांचे वजन, उंची शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी आदी क्षमता मोजून चाचणी घेण्यात आली. यात उपस्थित सर्वच बालकांनी धाडस दाखवत उत्तम प्रतिसाद दिला. स्टॉल मांडणीसाठी अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, गणपती लोहार, उज्वला नेसरकर, भावना अतवाडकर, मधुमती गावस, कविता पाटील,  अंगणवाडी सेविका मोहिनी मनोहर पाटील, रमेजा इब्राहिम मुल्ला, गीता अशोक कुंभार, मदतनीस रोहिणी गुरुसिद्ध बुरुड, अनुराधा नरसु खोराटे, जयश्री महादेव पोडजाळे यांनी परिश्रम घेतले.

            यावेळी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इम्तियाज अल्लाखान, बापू व्हन्याळकर, संतोष सूर्यवंशी, समिया बाडकर परशराम जाधव व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment