![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शनिवार दि. ३० एप्रिल २०२२ रोजी चंदगड पंचायत समिती आवारात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळचे माजी संचालक नामदेवराव कांबळे यांनी दिली.
शनिवारी सकाळी ९ .३० वाजता त्रिशरण व पंचशील ध्वजारोहण, सकाळी १० वाजता चित्ररथ व प्रभात फेरी, दुपारी १२ ते २ या वेळेत प्रबोधन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री भरमूआण्णा पाटील भूषविणार असून प्रमुख वक्ते डॉ. टी. एस. पाटील आहेत. तर अन्य प्रमुख पाहुण्यात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विरोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, माजी सभापती ॲड. अनंत कांबळे, भाजपा कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, एस. आर. देशमुख आदींचा समावेश आहे. सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment