तानाजी नारायण गडकरी |
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. ४० वर्षांच्या स्थापनेपासुन आजअखेर या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नूतन संचालकांचा सत्कार समारंभ सहाय्यक उपनिबंधक के. आर. कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
अध्यक्षपदासाठी तानाजी पांडुरंग गडकरी यांचे नाव जोतिबा मारुती हरकारे यांनी सुचवले तर उपाध्यक्ष पदासाठी मारुती भागोजी बेनके यांचे नाव संभाजी गुंडू बोकडे यांनी सुचवले. यावेळी उपसरपंच पांडुरंग कृष्णा बेनके, संभाजी गुंडु बोकडे, अनंत नारायण तुपारे, जोतिबा मारुती हरकारे, अर्जुन विठोबा बोकडे, दिपक जोतिबा बोकडे, मनीषा मारुती इंजल, सुप्रिया नामदेव बेनके, राजन नागोजी परीट, विष्णू विठ्ठल नाईक हे नूतन संचालक उपस्थित होते. यावेळी संदीप विठ्ठल बोकडे,प्रल्हाद ईश्वर गडकरी आदी उपस्थित होते. आभार उपसरपंच पांडुरंग बेनके यांनी मानले.
No comments:
Post a Comment