कानूर येथे पी. बी. पाटील यांचा शनिवारी सत्कार सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2022

कानूर येथे पी. बी. पाटील यांचा शनिवारी सत्कार सोहळा

 

पी. बी. पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

            कानूर (ता. चंदगड) परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पी. बी. पाटील यांच्या कार्याचा गौरव सोहळा शनिवार दि. ३० एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती शशिकांत पाटील यांनी दिली. 

       जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील उर्फ पी. बी. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव सोहळा असून या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक फेसकॉन कमिटी मुंबईचे सदस्य रामकुमार सावंत, कर्मवीर भाऊराव शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, प्रिन्स मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील हे प्रमुख वक्ते असतील. चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे आणि माजी सभापती ॲड. अनंत कांबळे, माजी उपसभापती सौ.मनिषा शिवनगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पी. बी. पाटील यांचा जाहीर सत्कार रामकुमार सावंत यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समिती मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment