पांडूरंग मेंगाणे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पांडूरंग मेंगाणे यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या झलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती ए. एस. काटकर यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदासाठी पांडुरंग मेंगाणे यांचे नाव संचालक विलास पाटील यांनी सुचविले. त्याला संचालक सोनाप्पा कोकितकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश सावंत, संचालक दत्ताराम कांबळे, सुनील कुंभार, उत्तम भोसले, संजय ढेरे, बसवानी शिरगे, मधुकर नागरगोजे, सुनितादेवी पाटील, सुरेखा नाईक उपस्थित होत्या. मावळते अध्यक्ष दत्ताराम कांबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष पांडुरंग मेंगाणे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी व्यवस्थापक गणपत सावंत, वैशाली गडकरी, प्रकाश पाटील, ईश्वर आवडण उपस्थित होते. आभार सुधीर लांडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment