म्हाळेवाडी येथे रविवारी कै. नरसिंगराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2022

म्हाळेवाडी येथे रविवारी कै. नरसिंगराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 कै. नरसिंगराव पाटील

माणगाव /  सी. एल. वृत्तसेवा

             दौलत साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, चंदगड मतदार संघाचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंगराव पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी व राजकीय चळवळीतील एक धडाधडीचे कार्यकर्ते व सच्चे समाज सेवक होते. ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गावचे सरपंच व सोसायटीचे अध्यक्ष यापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत तसेच सहकारी क्षेत्रातील देशपातळीवरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम केले. कृषी उद्योगाच्या क्षेत्रात जगाच्या पातळीवर विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे त्यांनी लक्ष पुरवले होते.

                                                                             जाहिरात

जाहिरात
         जगात होणारे नवे तंत्रज्ञान व सुधारणा लक्षात घेऊन त्यांनी चंदगडच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट उपसले.त्यांच्या आजच्या ८८ व्या जयंतीनिमित्त म्हाळेवाडी (ता. चंदगड) या मूळगावी  रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम होणार आहे. तर तत्पूर्वी मराठी विद्या मंदिर मध्ये सकाळी ८.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment