कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी ५ जून २०२२ रोजी आयोजित 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धेसाठी येणाऱ्या धावपटू, समर्थक, क्रीडा शौकिन व पर्यटकांसाठी चंदगड आगारातून खास एसटी बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. ५ जून रोजी पहाटे ३ ते ५ पर्यंत प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्या पारगड ला रवाना होणार आहेत. त्या चंदगड, हेरे, मोटणवाडी, वाघोत्रे ते पारगड मार्गावरील सर्व थांब्यावर थांबतील अशी माहिती आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन निकम यांचेसह प्रवीण चिरमुरे, रघुवीर शेलार, कान्होबा माळवे आदींनी केले आहे.
देशभरातील धावपटूंसाठी आव्हानात्मक व रोमांचकारी ठरणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे- ५ जून २०२२ सकाळी ४ पर्यंत स्पर्धकांचे आगमन, ५ वाजता कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती नाष्टा, ५.३० उद्घाटन, ६ वाजता २१ किमी जंगल हाफ मॅरेथॉन, (महिला), ६.१५ - २१ किमी (पुरुष). ६.३० वाजता १० किमी जंगल ड्रीम रन (महिला), ६.४५ जंगल ड्रीम रन (पुरुष). ७.०० वा. ५ किमी जॉय ऑफ जंगल (महिला), ७.१५ जॉय ऑफ जंगल (पुरुष). सकाळी ९ ते ११ वाजता होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास आमदार राजेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते धावपटू चंद्रकांत मनवाडकर (किणी) व तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दि. ४ रोजी येणाऱ्या स्पर्धक व समर्थकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था सशुल्क करण्यात आली आहे.
स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथून होईल. स्पर्धकांनी फार्म outplaysportsfoundation@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 9987322227/ 7021074762 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment