चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सुळये (ता. चंदगड) येथील माने कुटुंबाच्या कर्ता पुरूषाचे अचानक निधन झाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटूंबाला नागोजी माने यांच्या उत्तरकार्याला मदत व्हावी म्हणून चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) ने रोख पाच हजार रूपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुळये (ता. चंदगड) येथील नागोजी धोंडिबा माने (वय वर्ष -४२) या युवकाचा अकस्मिक मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूने कुटूंबातील आई, पत्नी, रशिया (१३वर्षे), स्वप्नील (९ वर्ष) आदर्श (५वर्ष) सर्व जण उघड्यावर पडले. ना राहयला घर, ना कुटूंबात आर्थिक भार उचलणारा कर्ता पुरुष. कर्ता पुरुष अकाली गेल्याने अवघे कुटूंबच उघड्यावर पडले. याबाबतची माहीती चंदगड तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांना सी. एल. न्युजने प्रसिध्द केलेल्या बातमीच्या आधारे मिळाली.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संपादक संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, जेष्ठ सदस्य अनिल धुपदाळे, उदयकूमार देशपांडे, निवृती हारकारे, एस. के. पाटील, संजय पाटील, तातोबा गावडा, नंदकिशोर गावडे, महेश बसापुरे, प्रकाश ऐनापुरे, सागर चौगुले आदींनी याबाबत बैठक घेऊन या कुटूंबाला नागोजी यांच्या उत्तरकार्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघाच्या माध्यमातून या अनाथ कुटूंबाला मदतीचे आवाहन करण्याचे ठरले. त्यानुसार पत्रकार संघाच्या वतीने सुळये (ता. चंदगड) येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव चेतन शेरेगार, संपादक संपत पाटील या पदाधिकाऱ्यांकडून विष्णू वंजारे, चन्नाप्पा गावडे, रामचंद्र गुरव, रमेश गावडे, राणबा गुरव, लक्ष्मण गावडे आदी ग्रामस्थांच्या उपस्थित रोख ५ हजारांची आर्थिक मदत केली.
या अनाथ कुटुंबाला हवा आहे मदतीचा हात
सुळये (ता. चंदगड) येथील नागोजी माने या कर्त्या पुरूषाचा अचानक मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या कुटूंबाला हवा आहे समाजातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थाचा मदतीचा हात.
माने कुटूंबाला घरकुल योजनेतून सन २०१५/१६ साली घर मंजूर झाले होते. त्यानुसार मयत नागोजी यांनी घराचे फौडेंशन ही बांधून ठेवले आहे. मात्र ७ वर्ष झाली तरी अद्याप या कुटूंबाला याेजनेतील पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे हे घर अपूरे आहे. तो पर्यंत या घराचा कर्ता पुरूषच देवाघरी गेल्याने अवघे कुटूंबच उघड्यावर पडले आहे. यासाठी सामाजिक जाणिवेतून आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदीनी शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
No comments:
Post a Comment