गोव्यातील मुरगाव येथे सूर संगीत महा केंद्राचे उदघाटनप्रसंगी करताना संगीत कलाकार प्रदीप नाईक व मान्यवर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गोमंतक ही देवभूमी असून या देव भूमीत अनेक हिंदू सनातन संस्कृतीचा इतिहास लाभलेला आहे. हिंदू धर्म सुख शांती भक्तिमार्ग दाखवू शकतो याच प्रेरणेतून लहानपणापासून भक्ती संगीताची गोडी लावल्याने मुलांमध्ये चांगले संस्कार होऊन देशभक्ती वाढीस लागावी या प्रेरणेतून संस्थेने सूरसंगीत महाकेंद्र प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गोवा येथील मुरगाव (वास्को) येथे करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध भजनी कलाकार गुरुवर्य प्रदीप रामा नाईक, सुप्रसिद्ध संगीत कलाकार दिग्दर्शक गोवा सरकारच्या कला गौरव पुरस्कार प्राप्त नारायण श्रीराम शेट तनावडे, संस्थेचे सल्लागार प्राचार्य संतोष चारी, श्रीमती रेणुका नाईक संस्थेचे प्रमुख योगेश शेट तानावडे व संस्थेचे संस्कृती प्रमुख शिवभक्त कल्लाप्पा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती माता फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवराच्या हस्ते झाली.
इलेक्ट्रॉनिक मोबाईल युगात आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. यामुळे पालकांनी लक्ष घालून आपल्या मूलांना सुरसंगीत न संपणारी भजन विद्या दयावी असे नाईक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. भजन संगीत ही विद्या इतकी मोठी आहे. ती सुख, शांतीचा व भक्तीचा मार्ग दाखवते असे नारायण तानावडे आपल्या भाषणात मत मांडले. यावेळी श्रीमती शकुंतला वेरेकर यांचे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेने आभार मानले. संभाजीनगर, मुरगांव, गोवा चाफेरान, झरीवाडे, विद्या मंदिर वाडे नवेवाडे, चिखली परिसरातील विद्यार्थी, पालक वर्ग व संगीत प्रेमी उपस्थित होते. योगेश तानावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर कल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment