कोवाड, ताम्रपर्णी नदीपात्राचे संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य महापुराचा धोका ओळखून गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या सूचनेवरून कोवाड ग्रामपंचायत कडून संभाव्य बाधीत क्षेत्रातील सर्व व्यापारी व नागरिकांना इशारा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कोवाड येथे सन २०१९, २०, २१ असा सलग तीन वर्षे प्रलयंकारी महापूर आला होता यात व्यापारी व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची यावर्षी पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन ही समज देण्यात आली आहे. या सूचनेनुसार सर्व व्यापारी व नागरिकांनी नदीचा संभाव्य पूर वाढत्या पाणीपातळीबरोबर दक्षता घेऊन आपली दुकाने व दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हालवावे. शेतकरी व नागरिकांनी पशुधन, मौल्यवान वस्तू, संसार उपयोगी साहित्यासह कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. अशा प्रकारच्या सूचना नोटीसीद्वारे देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन कोवाडच्या सरपंच सौ अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील व कमिटीने केले आहे.
No comments:
Post a Comment