दि न्यू इंग्लिशमध्ये सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षारोपण करताना अधिकारी. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
वाढते प्रदुषण, बेसुमार वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपनाचे महत्व पटवून देण्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाकडून दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याद्यापक आर. पी. पाटील यांनी मुलांना निसर्ग वाचवूयाची हाक दिली. शालेय परिसरात वड, पिंपळ बेल, करंज इ पर्यावरण पुरक रोपे लावण्यात आली.
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे तानाजी भोसले यांनी विद्यार्थ्याना आपली भारतीय संस्कृती व पर्यावरण यांचा संबंध अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. यावेळी ग्रंथपाल शरद हदगल यांनी पर्यावरण पुरक पुस्तकांचे प्रदर्शन भरविले. कार्यक्रमाला ए. डी. वाझे ' राजू पाटील, पांडूरंग खापरे ' अमर पवार, वाय. व्ही. पाटील, श्रीकांत कांबळे हरित सेना प्रमुख जे. जी. पाटील, एन. डी. देवळे, टी. एस. चांदेकर, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, व्ही. टी. पाटील, एस. जे. शिंदे, सूरज तुपारे, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी. साबळे तर आभार एम. व्ही. कानूरकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment