गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. सावंत व माजी खासदार संभाजीराजे यांची दिल्लीत भेट, गडकोट संदर्भात केली चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2022

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. सावंत व माजी खासदार संभाजीराजे यांची दिल्लीत भेट, गडकोट संदर्भात केली चर्चा

दिल्ली येथे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत गडकोटांबाबत चर्चा करताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याशी गडकोटांबाबत सविस्तर चर्चा झाली. 

          गोवा विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इतिहास अध्यासन केंद्र सुरू करावे ही मागणी मी २०२१ साली त्यांच्याकडे केली होती. स्वराज्याशी निगडित पोर्तुगीज दफ्तरातील कागदपत्रे येथे संशोधनासाठी उपलब्ध असतील. रायगड विकास प्राधिकरणाशी हे अध्यासन केंद्र संलग्न करावे, यासाठी देखील कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

       डॉ. प्रमोद सावंत यांची शिवभक्ती सर्वश्रुत आहेच. ६ जून श्री शिवराज्याभिषेक दिन त्यांनी गोवा सरकारचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरा केला होता. गोव्यातील छत्रपतींशी संबंधित किल्ल्यांचे गोवा सरकार व फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून जतन, संवर्धन व विकास करण्याबाबत देखील त्यांनी उत्सुकता दर्शवली.

No comments:

Post a Comment