चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील रवळनाथ को. ऑप. हाउसिंग सोसायटीच्या चंदगड शाखेने ग्रामीण विभागात उत्कृष्ट व्यवसायाबद्दल प्रथम क्रमांक प्राप्त केला. संस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी शाखा व्यवस्थापक दीपक शिंदे, शाखा चेअरमन पुष्पाताई नेसरीकर व सल्लागार प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक २३ मे २०२२ अखेर संस्थेने १६ कोटी १३ लाखांच्या ठेवींचे संकलन केले आहे. १३ कोटी ९२ लाख रुपयांची कर्ज दिली आहेत. थकबाकीची वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ६२० सभासद असलेल्या या शाखेची उलाढाल ३० कोटी इतकी आहे. सभासदांची विश्वासार्हता प्राप्त करून संस्था आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे. ही कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहेअसे उद्गार याप्रसंगी संस्थापक चेअरमन एम. एल. चौगुले यांनी काढले. यावेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक सौ. मीना रिंगणे प्रा. डॉ . किरण पोतदार, सुशांत करोशे, प्रा. डॉ. दत्ता पाटील, डॉ. संजय चौगुले, शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे (बेळगांव), प्राचार्य डॉ. के. एस. पाटील (जयसिंगपुर) प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर (निपाणी), प्राचार्य आर. बी. पाटील (नेसरी), प्रा. डॉ. विनायक आजगेकर, अशोक येजरे (कुडाळ) यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment