चंदगड पोलिसांच्याकडून पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी व अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी, यापुढे प्रत्येक शनिवारी व रविवारी नाकाबंदी - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2022

चंदगड पोलिसांच्याकडून पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी व अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी, यापुढे प्रत्येक शनिवारी व रविवारी नाकाबंदी

महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर  शिनोळी येथे  नाकाबंदी करून वाहने चेक करताना पोलिस.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हद्दीमध्ये तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

       सकाळच्या सत्रामध्ये शिनोळी नाका, दुपारी तिलारी परिसरात तसेच  चौकीसमोर आंबोली ते बेळगाव जाणारी वाहने अशा स्वरुपाची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईमध्ये एक अधिकारी, पाच कर्मचारी आणि पंधरा होमगार्ड इत्यादींनी सहभाग घेतला होता. पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी व अतिवेगाने चालवली जाणारी वाहने, त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आजचे नाकाबंदी लावण्यात आली होती. यापुढेही प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अशा स्वरुपाची मोठी व नाकाबंदी लावण्यात येणार  असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. 

        पर्यटकांना  आवाहन आहे की दारू सेवन करून पर्यटनाच्या ठिकाणी कोणीही हुल्लडबाजी करु नये. तसेच भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत, निमय मोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार असल्याचे चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment