जिल्हास्तरीय अथलेटिक स्पर्धेत भगतसिंग अकॅडमीचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2022

जिल्हास्तरीय अथलेटिक स्पर्धेत भगतसिंग अकॅडमीचे यश

कोल्हापूर जिल्हा अथलेटिक स्पर्धेत यश मिळवलेले भगतसिंग अकॅडमीचे विद्यार्थी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कोल्हापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत भगतसिंग अकॅडमी चंदगडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध गटात यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे १६ वर्षाखालील वयोगट - पृथ्वीराज सूर्यवंशी (थाळीफेक-कास्यपदक), १८ वर्षाखालील गट -  सोनाली पाटील (गोळाफेक- रौप्यपदक) राधिका नाईक (गोळाफेक- कास्यपदक), २० वर्षाखालील गट-  सुजाता भादवणकर  (भालाफेक - रौप्य तर गोळाफेक-  कास्य पदक),  स्नेहल तोराळकर (५००० मीटर धावणे- रौप्य पदक), मनोजकुमार हाळवणकर (गोळाफेक- रौप्य), रोहित हळवणकर  (भालाफेक- कांस्यपदक व डेक्थॅलॉन- सुवर्णपदक) पटकावले. हे सर्व विद्यार्थी तालुक्यातील विविध माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षण घेत असून भगतसिंग अकॅडमीमध्ये सराव करत आहेत. त्यांना प्रा. एम. एस. तावडे, प्रा. आर. टी. पाटील, प्रा. शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या आहारासाठी रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशराम काकतकर यांचे सहकार्य लाभले आहे.

No comments:

Post a Comment