स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चंदगड तालुक्यातील शहीद जवानाच्या वारसांचा भारत सरकारतर्फे सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2022

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चंदगड तालुक्यातील शहीद जवानाच्या वारसांचा भारत सरकारतर्फे सन्मान

 पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे शहीद जवानाच्या वारसांचा भारत सरकारतर्फे सन्मान करण्यात आला. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                प्रत्येकाचे जीवन अनमोल असते, परंतु देशासाठी स्वतःच्या आयुष्य बलिदान देऊन देश रक्षणासाठी शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबांच्या वेदना वेगळ्या आहेत. स्वतःसाठी मारणारे अनेक जण असतात, पण जे दुसऱ्यासाठी मरतात ते वीर असतात. अशा वीर शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान करण्याचा योग आपल्यालाआला हे आपले भाग्य अशी प्रतिक्रिया 5 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर मंजुनाथ हेगडे यांनी व्यक्त केली.

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या आदेशानुसार चंदगड तालुक्यातील शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान  कार्यक्रमात ते बोलत होते. पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण- पाटील महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्याने देशासाठी आपले बलिदान दिले अशा शहीद जवानांच्या वारसांना सम्मान कार्यक्रम चंदगड तालुक्यातील व्हि. के. चव्हाण- पाटील महाविद्यालयात संपन्न झाला. सुरुवातीला थोर देशभक्त यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यु. डी. पाटील यांनी केले. चंदगड तालुक्यातील शहीद जवान सुभेदार अर्जुन भोगण देवरवाडी, नायब सुभेदार दत्तात्रय आवडण हलकर्णी, लान्स नायक मारुती मडिलगेकर कौलगे, शिपाई शंकर मंणगुतकर तेऊरवाडी, शिपाई परशराम पाटील कालकुंद्री यांच्या वारसांचा यावेळी भारत सरकार तर्फे सन्मान करण्यात आला. 

              यावेळी बोलताना कमांडिंग ऑफिसर कर्नल मंजुनाथ हेगडे म्हणाले,``प्रत्येक मनुष्य जन्माला येतो आणि आपले आयुष्य जगत असतो. पण हे आयुष्य कसा जगला याला खूप महत्त्व असते. माणसाला मनुष्यदेह लाभलेला आहे त्या देहाचं जीवन सार्थकी लावणे हेच खरे जीवन असते. देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांच्या वेदना खूप मोठया आहेत  शहिदांच्या आठवणीचा सन्मान त्यांच्या  परिवाराला जगण्याचं बळ देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. संस्थापक सचिव जे. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या महाविद्यालयात भारत सरकारने घेतलेल्या या उपक्रमाचे यावेळी कौतुक केले.

             यावेळी व्यासपीठावर सुभेदार मेजर हिराचंद्र शिंदे, हवालदार शंकर सायनेकर, जे. बी. पाटील, एनसीसी युनिट अधिकारी प्राध्यापक व्ही. एस. गावडे उपस्थित होते महाविद्यालयाच्या एन. सी. सी. युनिटने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास नाईक यांनी केले.

No comments:

Post a Comment