फाटकवाडी घटप्रभा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु, प्रकल्प परिसरातील पावसाचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2022

फाटकवाडी घटप्रभा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु, प्रकल्प परिसरातील पावसाचा परिणाम

फाटकवाडी नजीकचा घट्प्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील फाटकवाडी नजीकचा घटप्रभा नदीवरील मध्यम पाटबंधारे प्रकल्प, धरण आज दिनांक ६ जुलै २०२२ रोजी दुपारी १ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यातून काही प्रमाणात म्हणजे केवळ ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने सुहास पाटील यांनी दिली. 

           पाणी पातळी ७४२.३५ मीटर इतकी असून सध्याचा पाणी साठा १५५९.९३४ दशलक्ष घनफूट (४४.१७२ दशलक्ष घनमीटर) व टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. मागील २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १८७ मिलिमीटर पाऊस झाला असून १ जून पासून १०५७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सकाळ पासून पावसाचे प्रमाण  कमी असल्यामुळे सांडव्यावरुन विसर्ग फार कमी आहे. याशिवाय विद्युतगृह विसर्ग व र्सिंचन विमोचक विसर्ग शुन्य क्युसेक असून पाण्याखालील बंधारे  निरंक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment