चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) पाटणे फाटा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण या संस्थेत सन २०२२/२३ या शैक्षणिक वर्षांसाठी इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, ड्रेस मेकिंग (मुलीसाठी) या व्यवसायामध्ये प्रवेशाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने होणार असून प्रवेश अर्ज admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत आले आहेत. अधिक माहितीसाठी या संस्थेतील माहिती कक्षास भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी यांनी केले आहे. अधिक संपर्क प्रा. एम. एम. कांबळे ९४२३१२०२६१, प्रा. एस. व्ही. ठाणेकर ९४२३२८१९६६ यांचेशी साधावा.
No comments:
Post a Comment