बांधकाम कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा, संस्थापक अध्यक्ष निवगीरे यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2022

बांधकाम कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा, संस्थापक अध्यक्ष निवगीरे यांची माहिती

 

कल्लाप्पा निवगिरे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ ह्या संघटनेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारानी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई ह्या मंडळाकडे या संघटनेच्या माध्यमातून नोंदणी केली होती. त्या कामगारांच्या पहिली पासून ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या बँक खात्यात शासना कडून देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यानी दिली.

         चंदगड तालुक्यात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी या संघटनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे आणि ज्यांची मुले शिक्षण घेत आहेत. परंतु शिष्यवृत्तीचे फाँर्म भरले नाहीत आशा बांधकाम कामगारांनी आपल्या मुलांचे शाळेचे बोनाफाईड, हजेरी पत्रक, शाळेची आयडेंटी व कामगाराने स्वत:चे आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, मंडळाचे ओळख पत्र, तडशिनहाळ फाटा येथील कार्यालयात जमा करावे.  शिष्यवृत्तीचे फाँर्म भरून घेऊन शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही श्री. निवगिरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment