बौध्द महासभेच्या वतीने चंदगड येथे वधूवर मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2022

बौध्द महासभेच्या वतीने चंदगड येथे वधूवर मेळावा संपन्न



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय बौध्द महासभा शाखा चंदगडच्या वतीने चंदगड येथे संपन्न झाला. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सचिव संगीता कांबळे यानी मेळाव्याचा हेतू स्पष्ट करून हा मेळावा मोफत असून समाजील बंधु भगिनींनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले. 

        यावेळी परिचय पत्रकानुसार अत भव दिप या संस्थेचे सभासद करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष ग. रा. कांबळे, केंद्रीय शिक्षक पि. के. कालकुंद्रिकर, सचिव एकनाथ कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष मेजर तुकाराम कांबळे, उपाध्यक्षा संगीता कांबळे, अनघा प्रधान, मिनाक्षी कांबळे, रूपेश म-यापगोळ यांच्यासह  दारक - दारिका उपस्थित होते. स्वागत एकनाथ कांबळे यांनी केले तर आभार ग.रा.कांबळे यांनी मानले.



No comments:

Post a Comment