मुंबई : कांदळवनचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या हस्ते अभिनयाचे सुवर्ण पदक स्वीकारताना सूर्यकांत हदगल. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) चे सुपुत्र व वनरक्षक सूर्यकांत शंकर गुरव यांनी वन प्रशिक्षण संस्था शहापूर (ठाणे) येथे दि. १६ जून २०२२ रोजी वन विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विशेष कलागुण कार्यक्रमात प्रथम क्रमांक घेऊन सुवर्ण पदक पटकवीले. त्यावेळी त्यांनी प्रसिध्द लेखक, अभिनेते योगेश सोमण लिखीत "एक एप्रिल" या एकांकिका मधील शेवटचा प्रसंग एकपात्री अभिनयातून सादर केला होता.
मुळात अभिनयाची आवड असल्याने नोकरी करत ते आपली कला जोपासत आहेत. या आधी त्यांनी पुणे येथे "स्नेह पुणे नाट्य संस्था" निर्मित एक एप्रिल, नातं या एकांकिका तसेच सत्तांतर - अभिवाचन प्रयोग, त्याबरोबरच यु ट्यूब वाहिनी एस् एम् प्रोडक्शन निर्मित कोरोना विषयावरील "एस् यू कॅन" शॉर्ट फिल्म, एकांकिका - प्रेक्षकांनी क्षमा करावी, शॉर्ट फिल्म - विनर, अशा विविध कला सादर करून अभिनय क्षेत्रात एक उत्तम अभिनेता म्हणून स्वतःची ओळख मिळविली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये पुणे येथे पु.ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट अभिनयाच पारितोषिक सुध्दा मिळाले आहे.
एक सामाजिक कार्यकर्ता तसेच उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून त्यांची चंदगड तालुक्यात ओळख आहे. सध्या ते कोल्हापूर वनविभाग येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज निसर्गाचे रक्षण करणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला निसर्गाने कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना, आपल्यासमोर आणून ठेवला आहे आणि नुसताच समोर आणला नाहीये तर त्या कलाकाराचे, त्याच्यातल्या असलेल्या कलेचे सुवर्ण पदक देऊन त्याचे कौतुक सुध्दा केले. म्हणतात ना काही लपत नसते आणि निसर्गापासून तर नाहीच नाही!
No comments:
Post a Comment