चंदगड तालुक्यातील ५ जि. प. गट व पं. स. च्या १० गणासाठी आरक्षण जाहिर - पं. स. पाच गणातील महिलांना संधी तर चार गण सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2022

चंदगड तालुक्यातील ५ जि. प. गट व पं. स. च्या १० गणासाठी आरक्षण जाहिर - पं. स. पाच गणातील महिलांना संधी तर चार गण सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी

 

पंचायत समिती चंदगड इमारत (संग्रहित छायाचित्र)

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

          सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या चंदगड पंचायत समितीच्या दहा जांगासाठी आज तहसील कार्यालयातील सांस्कृतिक सभागृहात तहसीलदार विनोद रणवरे यांच्या उध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. प्रशांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जि. प. च्या पाच गटाचे आरक्षण कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी  कार्यालयात काढण्यात आले.

          प्रारंभी निवडणूक नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी स्वागत केले. २००२ ते २०१७ या कालावधीत त्या मतदार संघात पडलेल्या आरक्षणाचा व इतर समाजातील लोकसंख्येचा विचार करून २०२२ मध्ये होणाऱ्या पंचायत समितीच्या गणासाठी आरक्षण काढण्यात आले . प्रारंभी कानूर खुर्द येथील पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहिर करण्यात आले . अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित करून घेण्यात आले. २००२ ते २०१७ या कालावधीत एकदाही या गणासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण न आल्याने ते निश्चित करून घेण्यात आले. गवसे, अडकूर, माणगाव, कुदनूर, शिनोळी, तुर्केवाडी हे गण अनुसूचित जातीसाठी निश्चित करण्यात आले. ज्या गणामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या उतरत्या वमाने जास्त असल्याने ( १५८५ ) शिनोळी बुद्रुक हा गण अनुसूचित जाती महिला • प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी गवसे , कुदनूर , तुर्केवाडी हे तीन गण पंचायतसमितीसाठी निश्चित करण्यात आले . यामध्ये दोन गणांच्या चिठ्ठया कुमार विद्या मंदिरचा विद्यार्थी श्लोक डांगे याने काढल्या . यामध्ये गवसे , कुदनूर हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले . त्यानंतर कुदनूर गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण निश्चित झाले . अडकूर व तुडये सर्वसाधारण गणासाठी २ गण निश्चित करण्यात आले . याठिकाणी चिठ्ठी काढण्यात आली . चिठ्ठीद्वारे तुडये गण • सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित करण्यात आला . उर्वरीत कोबाड गण सर्वसाधारण , माणगाव गण सर्वसाधारण महिला , तुर्केवाडी गण सर्वसाधारण , हेरे गण सर्वसाधारण निश्चित करण्यात आले आहे . निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रकाश जाधव , राजू माळी , निहाल मुल्ला आदींनी परिश्रम घेतले . 

यावेळी माजी जि. प. सदस्य भरमाण्णा गावडा, राजेंद्र परिट, प्रविण वाटंगी, भिकू गावडे, शिवानंद हुंबरवाडी, अल्लीसो मुल्ला, दिवाकर पाटील,सरपंच डी जी नाईक, प्रताप सूर्यवंशी , शंकर मनवाडकर , कल्लाप्पा निवगिरे, अमर नाईक, कृष्णा पाटील, गावडू पाटील, रवि नाईक, पिनु पाटील, विलास सुभेदार विलास नाईक, आदीसह विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी उद्या (२९ जुलै रोजी) आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणा आहेत. तर २९ ते २ ऑगस्ट दरम्यान, आरक्षणावर नागरिकाना हरकती व सूचना करण्यात येतील.

चंदगड पंचायत समिती गणासाठी निश्चित करण्यात आलेले आरक्षण पुढील प्रमाणे ..........
अडकूर, कोवाड, तुर्केवाडी, हेरे (सर्वसाधारण) कानूर खुर्द, माणगाव, तुडये (सर्वसाधारण महिला), गवसे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कुदनूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), शिनोळी बुद्रुक (अनुसूचित जाती महिला). 

        चंदगड तालुका जिल्हा परिषद ५ गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे :

 १) कुदनूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, २) माणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ३) गवसे : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, ४) तुर्केवाडी : सर्वसाधारण महिला, ५) तुडये : सर्वसाधारण पुरुष

         

No comments:

Post a Comment