सुंडी येथील संत तुकाराम हायस्कूलमध्ये कै. आर. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सुंडी (ता. चंदगड) येथील संत तुकाराम हायस्कुलमध्ये कै. आर. व्ही. पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत रामचंद्र पाटील यांनी शाळेतील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डी. घोळसे होते.
प्रारंभी प्रास्तविक शाळेचे लिपीक व्ही. एस. पाटील यांनी कै. आर. व्ही . पाटील सरांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रशांत पाटील यांनी आपल्या वडिलांचे शैक्षणिक कार्य याविषयी माहिती दिली. त्यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील यानी आपले वडील कै. आर. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेतील कोणत्याही स्पर्धा घेतल्या कि त्यातील पहिली तीन बक्षिसे आपण देऊ असे जाहीर केले. यावेळी सुंडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. माधुरी विश्वनाथ पाटील यांनीही आपला मुलगा कै. साईराज पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेचा विद्यार्थी कु. सिद्धेश काशिनाथ भारती याला शालेय गणवेशासाठी रोख रक्कम ५०१ ची मदत केली. आपल्या मनोगतात त्यांनी याहून पुढे देखील गरजू विध्यार्थ्याना आर्थिक मदत दिली जाईल असे जाहीर केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक घोळसे यांनी प्रशांत पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाला नारायण पावले, संभाजी शंंकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. व्ही. केसरकर यांनी केले. तर आभार एम. के. भुजबळ यांनी मानले.
No comments:
Post a Comment