माडवळे शाळेचे शिक्षक वसंत एटले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2022

माडवळे शाळेचे शिक्षक वसंत एटले यांचे निधन

वसंत एटले

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक वसंत वैजनाथ एटले  (वय - ५३) यांचे काल बुधवार २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. ते मराठी विद्या मंदिर माडवळे (ता. चंदगड) येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. श्री देव वैजनाथ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, दोन भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. यांच्या आकस्मिक निधनामुळे प्राथमिक शिक्षक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment