हलकर्णी महाविद्यालयात कारगिल विजयदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2022

हलकर्णी महाविद्यालयात कारगिल विजयदिन साजरा

हलकर्णी महाविद्यालयात कारगिल विजयदिन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथील  सांस्कृतिक विभागामार्फत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील  अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. पाटील हे उपस्थित होते. देशभक्ती व त्यागाचे प्रतीक म्हणून कारगिल युद्धाकडे बघितले जाते अशा शब्दात कार्यक्रमाचा हेतू  या प्रास्ताविकेतून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एन एम कुचेकर यांनी स्पष्ट केला.

         यावेळी बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले, ``भारत आणि पाकिस्तान मध्ये १९९९ मध्ये झालेल्या कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली  म्हणून हा दिवस आपण साजरा करत आहोत. कित्येक दिवसाच्या संघर्षानंतर २६ जुलै रोजी विजय संपादन करण्यात भारतीय सैन्याला यश आले. ज्या जवानांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले त्याबद्दल आम्ही नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजेत तसेच देश प्रेम कसे असावे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कारगिलचे हे युद्ध. सैनिकांचा आदर्श ठेवून तरुणांनी देश प्रेम जपावे अशा शब्दात सरांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जे. के. पाटील, प्रा. एन. पी. पाटील, प्रा. अंकुश नौकुडकर, अधीक्षक प्रशांत शेंडे, प्रा. उत्तरे, प्रा. एस. डी. पाटील, प्रा. गीतांजली पाटील, सौ. वंदना केळकर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए. बी. पिटूक व आभार प्रदर्शन प्राध्यापक शाहू गावडे यांनी केले.

No comments:

Post a Comment