उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखाप्रमुखांकडून शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2022

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखाप्रमुखांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

दुंडगे शाळेत शिक्षकांसह शिवसेना शाखाप्रमुख मारुती पाटील व विद्यार्थी.


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

            शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त कुमार विद्यामंदिर दुंडगे (ता. चंदगड) शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दुंडगे शिवसेना शाखाप्रमुख मारुती पाटील यांच्यामार्फत शाळेतील  इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन आदी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अध्यापक पा. रा. पाटील यांनी स्वागत केले. अध्यापक सागर खाडे, रमेश कांबळे, चव्हाण आदी शिक्षक  उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुवर्णा आंबेवाडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment