आजरा आगाराची सांबरे, मलतवाडीमार्गे बेळगाव बस सुरू, प्रवाशांत समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2022

आजरा आगाराची सांबरे, मलतवाडीमार्गे बेळगाव बस सुरू, प्रवाशांत समाधान

मलतवाडी येथे आजरा, मलतवाडी मार्गे बेळगाव बसचे स्वागत करताना मान्यवर व ग्रामस्थ

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

                गेली दोन वर्षे कोरोना व एसटी कर्मचारी संपामुळे बंद असलेली आजरा आगाराची आजरा, नेसरी, सांबरे, मलतवाडी, कोवाड  मार्गे बेळगाव एसटी बस नुकतीच पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या कामी खासदार धनंजय महाडिक यांनी आजरा आगार व्यवस्थापकांना गाडी सुरू करण्याबाबतचे पत्र दिले होते.

         बस सुरू झाल्यामुळे कानडेवाडी, कुपे, तावरेवाडी, सांबरे, कुमरी, मलतवाडी, घुल्लेवाडी, निटूर आदी गावातील ग्रामस्थ, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, आजारी रुग्ण, वयोवृद्धांची सोय झाली आहे. ही बस सकाळी ८ वाजता आजरा येथून निघते, १० वाजता मलतवाडी येथून निट्टूर, कोवाड मार्गे बेळगावला जाते. पहिल्या दिवशी मार्गावरील गावांत प्रवासी व ग्रामस्थांनी बसचे उत्स्फूर्त स्वागत केले. मलतवाडी येथे मायाप्पा मंदिर चौकात  बसचे पूजन व चालक वाहक यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मोहिनी पाटील, गणपत पाटील, मायाप्पा पाटील, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामी धनंजय महाडिक युवाशक्तीचे चंदगड तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील यांनी खा. महाडिक यांना या कामी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

No comments:

Post a Comment