महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेवेळी बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, शेजारी इतर मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
रांगोळी ही कला संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे. या कलेचा आविष्कार केवळ मनोरंजनासाठी होत नसून तणावाचे व्यवस्थापन करण्यातही या कलेचा उपयोग होतो. संस्कृतीचा आविष्कार रांगोळी घडवत असते. आजच्या धकाधकीच्या युगात परंपरेचा हा समृद्ध वारसा जतन करून वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीआहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.
स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन सौ. विद्या पाटील यांनी केले. खजिनदार डॉ. एस. डी. गोरल यांनी उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले. समन्वयक डॉ. आर. ए. कमलाकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करणारे प्रास्ताविक केले.प्रारंभी वृक्षाला जलार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. एस. के. सावंत, सचिव डॉ. पी. एल. भादवणकर यांच्यासह प्राध्यापक, सेवक, स्पर्धक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परीक्षक म्हणून सुनील कांबळे, व्ही. के. गावडे व संजना लोहार यांनी काम पाहिले. विजेच्या सर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिके देवून गौरविण्यात आले. यावेळीझालेल्या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे - वरिष्ठ गट (अनुक्रमे )अनिल सुतार, मारुती आंबेवाडकर, तनुश्री बेनके, स्वाती गावडे, पूजा कांबळे. कनिष्ठ गट . (अनुक्रमे) श्रावणी पाटील, दीक्षा फुटाणे, पौर्णिमा खरुजकर, मयुरी देसाई, झिया पीरजादे.कनिष्ठ गटातील सर्वच स्पर्धकांना महाविद्यालयाचे ग्रंथपाल रा. सु. गडकरी यांनी प्रोत्साहनपर पारितोषिके दिली. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी तर प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. आर. व्ही. आजरेकर, एम. एम. पीरजादे यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment