वरगाव येथे अतिवृष्टीने पडलेले घर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वरगाव (ता. चंदगड) येथील जयवंत मारूती पाटील (वय ५०) या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत घर कोसळून लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील जनावरे बाहेर सोडल्याने या दुर्घटनेत सुदैवाने बचावली. काल सकाळी मुसळधार पावसाने ११ वाजता हे घर पडले. सकाळी ४ जनावरे चरायला सोडली होती. त्यामुळे या दुर्घटनेत ती बचावली. पण वैरण, चारा व शेतीची अवजारे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेआहे. संबधीत अधिकाऱ्यांन नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment