चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शनिवार दि. २३ जुलै रोजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गतस्मृतींना उजाळा देण्याबरोबरच महाविद्यालयाच्या भावी प्रगती साठी रूपरेषा ठरवण्यासाठी विचारविनिमय करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास कला वाणिज्य विज्ञान शाखेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment