देवरवाडी येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद, ८० पिशव्या रक्त संकलन - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2022

देवरवाडी येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद, ८० पिशव्या रक्त संकलन

 

देवरवाडी येथील रक्तदान शिबिरात सहभागी झालेले रक्तदाते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         देवरवाडी (ता. चंदगड) प्रिन्स पाईप अँड फिटींगचे अध्यक्ष जयंत छेडा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाम ब्लड बँक व  प्रिन्स पाईप अँड. फिटींग लि. यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिर घेण्यात आले.
        यावेळी कंपनीचे एच आर मँनेजर आशिष जोशी, आनंदा पोटले, दादासो गाडे, वैजनाथ गडकरी, कॅजिटन डिमोल्लो, अजीम मोमीन, बसू जोई  उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवक पुंडलिक कांबळे, वसंत भांदुर्गे, संभाजी मनवाडकर, निलेश कलखांबकर, किरण करडे, वैभव अंधुचे आदीसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. 


No comments:

Post a Comment