वाहतुकी कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सुविधा - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

वाहतुकी कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सुविधा

 बेळगाव शहरात आमदार अभय पाटील यांनी इलेक्ट्रिक स्कूटरवरुन असा फेरफटका मारला.


बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

           शहरातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्प्यात जनतेला  पंचवीस इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्या आहेत. 


       दुसऱ्या टप्प्यात आणखी पंचवीस इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर ४० मिनिटे चार्ज केल्यावर ताशी ३० किलोमीटर वेगाने वीस किलोमिटर धावू शकते. आमदार अभय पाटील यांनी स्वतः प्रकाश टॉकीज पासून शिवाजी उद्यान पर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर चालवून अनुभव घेतला. बेळगाव शहरात अशा तऱ्हेची इलेक्ट्रिक स्कूटर प्रथमच दाखल झाली आहे. आमदार अभय पाटील यांच्या समवेत नगरसेवक जयंत पाटील यांनी देखील इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा अनुभव घेतला.

No comments:

Post a Comment