बसची दुचाकीला पाठीमागून धडक होवून अपघात, दोघेजण दुचाकीस्वार जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

बसची दुचाकीला पाठीमागून धडक होवून अपघात, दोघेजण दुचाकीस्वार जखमी

अपघाताचे दृश्य

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

          बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे चुलत भाऊ सुदैवाने मृत्यूच्या दाढेतून परत आल्याची घटना बेळगाव जवळ घडली. सी सी टी व्ही मध्ये हा अपघाताचा थरार कैद झाला आहे. बसवन कुडची येथील सुभाष कल्लाप्पा बेडका (४०) आणि सुधीर नागप्पा बेडका (२६) असे अपघातातून बचावलेल्या चुलत भावाची नावे आहेत.

      निलजी जवळील कुबेर धाबा जवळ हा थरारक अपघात घडला. बेळगावहून जमखंडीला जाणाऱ्या बसने मागून दुचाकीला धडक दिली. त्यावेळी दुचाकीवर बसलेला एक जण बाजूला पडला तर दुसरा बसच्या दोन्ही चाकाच्या मध्ये पडला. बस चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवून बस थांबवल्याने दोघांचे प्राण वाचले. या अपघाताची मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. 

No comments:

Post a Comment