तुर्केवाडी येथे जमीन वादातून घराचे व उसाचे नुकसान, ११ जणावर गुन्हे दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2022

तुर्केवाडी येथे जमीन वादातून घराचे व उसाचे नुकसान, ११ जणावर गुन्हे दाखलचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे जमिनीच्या जुन्या वादातून जनावरांचा गोठा पडून शेतीचे नुकसान केल्या प्रकरणी अकरा जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना काल बुधवारी १० ऑगस्ट रोजी तुर्केवाडी येथे घडली. या प्रकरणी गणपतराव दत्तात्रय जाधव (वय ५० वर्षे, रा. तुर्केवाडी ता. चंदगड) यांनी फिर्याद दिली असून बाबाजी गणू गावडे, विश्वनाथ गणू गावडे, मल्लवा बाबाजी गावडे, शोभा विश्वनाथ गावडे, पुंडलीक बाबाजी गावडे, निशा राजू गावडे, राजू बाबाजी गावडे (सर्व रा.तुर्केवाडी ता.चंदगड) इतर चौघेजण अशा अकरा लोकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. 

          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचेमध्ये गेल्या दोन वर्षापासून जमिनीच्या हक्काविषयी वाद चालू आहे. सदरचा वाद हा न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने शेतीच्या वादामध्ये या क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश दिला आहे. असे असताना संशयित आरोपींनी संगनमताने मनाई लावलेल्या शेतात जाऊन फिर्यादी यांच्या जनावरांचा गोठा पाडून तेथील उभे उस पिक कापून नुकसान केल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. तसेच याबाबत विचारणा करायला गेले असता फिर्यादीला शिवीगाळ करून धमकवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment