चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशभर राबविले जात आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय चंदगड व अन्य शासकीय–निमशासकीय आस्थापनांच्या वतीने घर-घर तिरंगा प्रबोधन रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
रॅलीमध्ये चंदगड शहरातील सर्व शाळा- महाविद्लायांचे आजी-माजी विद्यार्थी, एन. एस. एस. स्वयंसेवक आजी-माजी सैनिक, रेस्क्यू फोर्स, वनविभाग, पोलीस मित्र, पंचायत समिती, शिक्षण विभाग, नगरपंचायत कर्मचारी, बार असोसिएशन ई. विभाग सहभागी झाले होते. तालुक्याचे आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे व शिक्षकांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयातून सुरुवात झाली, नवीन वसाहत, विनायक नगर, रवळनाथ गल्ली, ब्राम्हण गल्ली, कुंभार गल्ली, आझाद गल्ली, गुरुवार पेठ या मुख्य बाजारपेठेतून चंदगड पंचायत समिती कार्यालयात येऊन राष्ट्रगीतानंतर समापन समारंभ झाला व रॅलीचे विसर्जन झाले. ग्रामस्थांचे उत्तम प्रबोधन होण्यास मदत झाली. नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यासं चांगली मदत झाली.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चंदगड तालुक्याच्या विविध भागातून महिला बचत गटांनी आपले विविध प्रकारचे स्टाल मांडणी केली होती. सेंद्रिय व घरगुती पद्धतीचे धान्य, कडधान्य फळे, भाज्या नाचणी व नाचणीचे वेगवेगळे पदार्थ ग्राहकांचे मन जिंकून गेले. विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. भारत सरकारच्या स्टार्टअप मोहिमेला चालना देणारा हा स्तुत्य उपक्रम ठरला. रसिकांची भरभरून दाद मिळाली.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील, डॉ. एन के. पाटील, प्रा. आर.एस. पाटील, प्रा. व्ही. के गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व स्वयंसेवकांनी सहभागी होऊन रॅली यशस्वीरीत्या पार पाडली.
No comments:
Post a Comment