संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ऐतिहासिक किल्ले गंधर्वगड (ता. चंदगड) येथील कड्या वरून मुसळधार पावसात चारशे फूट खाली पडल्याने अनिल जानबा होडगे या शेतकऱ्याच्या म्हैशीचा जागीच मृत्यु झाला असून या मध्ये या शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुकसान झाले आहे.पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांने केली आहे.
काल बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गंधर्वगडावरील हनुमान मंदिर परिसरात श्रीमती होडगे यांनी आपली जनावरे चरायला सोडली होती.इतर जनावरांसोबत चारा खात कोरज गावाच्या बाजुला असलेल्या दिशेला आली होती.मुसळधार पाऊस असल्याने समोरील बाजुचे काही दिसत नव्हते.पाऊस मोठा असल्याने जनावरांना घरी घेऊन येत असताना कोरज गावाकडील बाजुला असलेल्या कड्यावरून पाय घसरल्याने म्हैस चारशे फूट खाली कोसळल्याने म्हैशीचा जागीच मृत्यु झाला. आठ महिन्यापुर्वीही अनिल होडगे यांच्या आणखी एक म्हैशीचा याच कड्यावरून पडून मृत्यु झाला होता. तर गंधर्वगडाला संरक्षक कठडे नसल्याने दरवर्षी एक दोन जनावरे वरून खाली पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शासनाने गंधर्वगडाभोवती संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment