आशा सेविका एकमेकींना राखी बांधताना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील पंचायत समितीच्या सभागृहात आशा सेविकांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधन उत्सवाची परंपरा खूप प्राचीन असून त्यात केवळ भावाने बहिणीचे रक्षण करावे एवढा मर्यादित संदेश नसतो. संपूर्ण समाज परस्परांचे रक्षण करणारा असावा असा या उत्सवाचा एक व्यापक अर्थ आहे. नेमका हाच संदेश देण्यासाठी कानूर खुर्द येथील गटप्रवर्तक आरती चंदगडकर आणि कोवाड प्राथमिकआरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक सरिता पाटील यांनी पुढाकार घेऊन रक्षाबंधनाचा उत्सव पार पाडला. यात सुमारे ५० आशा सेविकांनी परस्परांना राख्या बांधल्या.एकमेकीना सदिच्छा देण्याबरोबर सांस्कृतिक परंपरा जपणे व संपूर्ण समाजाला सामूहिक सुरक्षिततेचा संदेश देण्याचा हेतू या कार्यक्रमाच्या आयोजना मागे होता. कार्यक्रम खेळीमेळीच्या व उत्साहात पार पडला.
No comments:
Post a Comment